गुन्हेगारांना चटईवर बसवून शहर पोलिसांची ‘नम्र’ विनंती!; ‘लातो’ के भूत ‘बातों’ से मानणार?

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील ड्रग्‍जच्या रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. शहर-जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक वाचक असलेल्या छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजनेही यात सहभाग देत प्रत्‍येक बातमीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ‘जनहितार्थ जाहिराती’द्वारे केले आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकत अशा गुन्हेगारांची परेड घेतली. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील ड्रग्‍जच्या रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. शहर-जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक वाचक असलेल्या छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजनेही यात सहभाग देत प्रत्‍येक बातमीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ‘जनहितार्थ जाहिराती’द्वारे केले आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकत अशा गुन्हेगारांची परेड घेतली. ड्रग्‍ज रॅकेटमध्ये सक्रीय असण्याची शक्‍यता असलेल्या आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर बोलाविण्यात आले होते. चटईवर बसवून त्‍यांना ड्रग्‍जची विक्री न करण्याचे ‘नम्र’ आवाहन करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली ही रिक्वेस्ट ते कितपत अंमलात आणतात, हे येणारा काळच सांगणार आहे. शहरात ड्रग्‍जची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुन्हेगारी वाढली असून, लुटमारीच्या घटना सर्रास घडत आहेत. तरुणाला ड्रग्‍जचा विळखा पडत चालला आहे. त्‍यामुळे ड्रग्‍जची विक्री व सेवनाला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नुकतेच स्वतंत्र एनडीपीएस पथक स्थापन केले आहे. ड्रग्‍ज विक्रीत वारंवार नावे समोर येणाऱ्या गुन्हेगारांना सोमवारी सकाळी साडेदहाला बोलाविण्यात आले. दुपारी साडेबारापर्यंत त्‍यांचा बौद्धिक वर्ग घेण्यात आला.

८९ गुन्हेगार ‘मिटिंग’ला…
शहर पोलीस आयुक्‍तालयाच्या कार्यक्षेत्रातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ८९ गुन्हेगार मिटिंगसाठी हजर होते. टॉप २५ गुन्हेगारांपैकी १० जण आले होते. ९ जण वेगवेगळी कारणे देत येऊ शकले नाहीत. ६ जण कारागृहात आहेत. मिटिंगला आलेल्या सर्वांकडून नाव, मोबाइल क्रमांक, नातेवाइकांची नावे, त्‍यांचे मोबाइल क्रमांक, निवास पत्ता, किती गुन्हे दाखल आहेत, असा अर्ज भरून घेण्यात आला. सर्वांचे समोरून आणि दोन्ही बाजूंनी चेहऱ्याचे फोटो काढण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्‍त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्‍त धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, एनडीपीएस पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी सर्व पाहुण्यांना सध्या तरी इशाऱ्यातून समजावले आहे.

मोठ्या हॉटेल्सवर नजर ठेवण्याची गरज…
ड्रग्‍जची पाळेमुळे खोदायची असतील तर केवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या भरवशावर न बसता कारवाईला व्यापक स्वरुप देण्याची गरज आहे. शहरातील अनेक प्रसिद्ध, मोठ्या हॉटेल्स, बारमध्ये होणाऱ्या पार्ट्यांत केली जाणारी नशाही टार्गेटवर आणण्याची गरज आहे. रविवारी फ्रेंडशीप डेनिमित्त शहरातील अनेक मोठ्या हॉटेल्स, बारमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले होते. या पार्ट्यांत अनेक जण ड्रग्‍जच्या नशेत झिंगल्याची चर्चा आहे. मात्र स्थानिक पोलीस किंवा एनडीपीएस पथकाला कानोकान खबर नव्हती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...

Latest News

पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं... पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चोरीच्या उद्देशाने तरुण फिरत असल्याच्या संशयाने नागरिकांनी चौकशी केली असता, एकाने पळ काढला, तर दोघे...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software