- Marathi News
- सिटी क्राईम
- रस्त्यावर खड्डा खोदला, ना सूचना फलक लावला, ना बॅरिकेड्स, बापलेक जखमी झाल्यानंतर पोलिसांनी घेतली मोठ...
रस्त्यावर खड्डा खोदला, ना सूचना फलक लावला, ना बॅरिकेड्स, बापलेक जखमी झाल्यानंतर पोलिसांनी घेतली मोठी ॲक्शन!, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील घटना
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरवून सिडको एमआयडीसी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध रविवारी (४ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराने रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी जाऊन बाप-लेक गंभीर जखमी झाले. या ठिकाणी आवश्यक सूचनेचा बोर्ड, बॅरिकेड्स लावलेले नव्हते. एका राजकीय नेत्याच्या भावासह मोठ्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम घेतल्याचे समोर येत असून, काम घेतल्यानंतर बेजबाबदारपणे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरवून सिडको एमआयडीसी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध रविवारी (४ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराने रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी जाऊन बाप-लेक गंभीर जखमी झाले. या ठिकाणी आवश्यक सूचनेचा बोर्ड, बॅरिकेड्स लावलेले नव्हते.
दोन वर्षांपूर्वीच तयार केलेला व सध्या सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्यात आहे. जालना रोड, एसटी वर्कशॉप ते एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे असा हा रस्ता आहे. याच रस्त्याने जगन्नाथ बाबुराव कुलकर्णी (वय ३९, रा. नारेगाव) हे १० वर्षांचा मुलगा सोहमसह २२ जुलैला रात्री ९ वाजता दुचाकीने घरी जात होते. मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप येथून वळण घेऊन ते फॅक्सोप्लास कंपनीच्या दिशेने निघाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 08:24:36
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चोरीच्या उद्देशाने तरुण फिरत असल्याच्या संशयाने नागरिकांनी चौकशी केली असता, एकाने पळ काढला, तर दोघे...