- Marathi News
- सिटी डायरी
- साहेब खून झाला लवकर या… वाळूज MIDC पोलिसांची उडाली धावपळ, ‘बकरा’ करणाऱ्याला मग पोलिसांनीच शिकवला धडा...
साहेब खून झाला लवकर या… वाळूज MIDC पोलिसांची उडाली धावपळ, ‘बकरा’ करणाऱ्याला मग पोलिसांनीच शिकवला धडा!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांत खुनाच्या दोन-तीन घटना घडल्याने सध्या वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस कमालीचे अलर्ट झाले आहे. थोडेही कुठे खुटं वाजले की लगेच पळापळ होते…याचा एकाने चांगलाच गैरफायदा घेतला..काही लोक त्याला त्रास देत होते, त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्यानं पोलिसांचा बकरा केला… ११२ डायलवर त्याने खून झाल्याची खोटीच माहिती दिली. त्यामुळे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांत खुनाच्या दोन-तीन घटना घडल्याने सध्या वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस कमालीचे अलर्ट झाले आहे. थोडेही कुठे खुटं वाजले की लगेच पळापळ होते…याचा एकाने चांगलाच गैरफायदा घेतला..काही लोक त्याला त्रास देत होते, त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्यानं पोलिसांचा बकरा केला… ११२ डायलवर त्याने खून झाल्याची खोटीच माहिती दिली. त्यामुळे वाळूज एमआयडीसी पोलिसांची शुक्रवारी (२ ऑगस्ट) धावपळ उडाली. सगळीकडे शोध घेऊनही काहीच मागमूस लागत नसल्याने पुन्हा ज्या नंबरवरून कॉल आला त्याला कॉल केला तर तो नंबर बंद… त्यामुळे पोलीस आणखीनच तणावाखाली आले. त्याचे तर काही बरेवाईट झाले नाही ना, या शंकेने त्यांनी त्याचा शोध सुरू केला. काही वेळाने नंबर चालू झाला असता त्याने आपको बनाया किस लियें..चा उलगडा केला. पोलिसांनी त्याची मानगूट धरून कोठडीत डांबला आहे…
शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजता डायल ११२ वर कचरू सखाराम शहाणे (रा. बजाजनगर) याने फोन करून वाळूजला खून झाल्याचे सांगितले. पोलीस अंमलदार कल्याण खामकर, महेंद्र साळुंके यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांना लगेच कळवले. पोलिसांची पळापळ सुरू झाली. पण खून झाल्याचे कुठेच काही नव्हते. माहिती देणाऱ्याला संपर्क साधला असता त्याचाही फोन बंद होता. पोलिसांनी अख्खा एमआयडीसी परिसर पिंजून काढला. दोन मृतदेह खदानीत आढळल्याने खदानीही धुंडाळल्या.