प्रेमाला घरातून विरोध असल्याने युगुलाची विष पिऊन आत्‍महत्‍या, पुण्याची घटना

On

पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन-तीन वर्षापासून प्रेमसंबंधात असलेल्या युगुलाने प्रेमाला घरातून विरोध झाल्याने पुण्याच्या खडकवासला बॅकवॉटर परिसरात येऊन विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (१० जुलै) रात्री घडली. शुक्रवारी सकाळी दहाला घटना समोर आली. अक्षरा दत्तात्रय गुरसाळे (वय १६, रा. मांजरी रोड, महादेवनगर, हडपसर पुणे) आणि संतोष बाळासाहेब कळसाईत (सध्या रा. महादेवनगर, पुणे, मूळ […]

पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन-तीन वर्षापासून प्रेमसंबंधात असलेल्या युगुलाने प्रेमाला घरातून विरोध झाल्याने पुण्याच्या खडकवासला बॅकवॉटर परिसरात येऊन विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (१० जुलै) रात्री घडली. शुक्रवारी सकाळी दहाला घटना समोर आली.

अक्षरा दत्तात्रय गुरसाळे (वय १६, रा. मांजरी रोड, महादेवनगर, हडपसर पुणे) आणि संतोष बाळासाहेब कळसाईत (सध्या रा. महादेवनगर, पुणे, मूळ रा. रावळगाव, कर्जत, जि.अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. अक्षरा अकरावीत शिकत होती. तिच्या बहिणीने क्लाससाठी वानवडीतील फिजिक्‍सवाला ट्युशन येथे सोडले होते. क्लास संपल्यानंतर ती घरी परतली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. त्यामुळे अक्षराच्या बहिणीने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. वानवडी पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. त्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क केला. संतोष कळसाईत यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाइल बंद लागला. त्याच्या मूळ गावीही पोलिसांनी संपर्क केला.

त्याचा मोबाइल सायंकाळी साडेपाचपासून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सकाळपासून पोलीस महादेवनगर परिसरात त्या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान, उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना दोन तरुण मुला- मुलींचे मृतदेह आढळले. त्यांनी ही माहिती तातडीने वानवडी पोलिसांना दिली. त्यावेळी या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याने व त्याला घरातून विरोध झाल्याने त्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला परिसरात येऊन विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खडकवासला जंगलात या प्रेमीयुगुलाने विष घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरीही मुलाचा मृतदेह पाहिल्यावर त्याची जीभ बाहेर आलेली होती. त्यामुळे विष घेतल्यावर जीभ बाहेर येते का, ही आत्महत्या आहे की घातपात आहे, अशी चर्चा घटनास्थळी होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच याची उकल होईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software