छत्रपती संभाजीनगर- पैठण महामार्गाच्या कामाला गती; अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांची विधानसभेत माहिती

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा ४२ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गातील ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा ४२ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गातील ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सदस्य विक्रम काळे यांनीही उपप्रश्न विचारले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, या रस्त्याचे काम सलग न झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) रस्त्याखालील पाईपलाईनचे काम हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळे काही अडथळे निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनचे काम पूर्ण होईल. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर बोर्ड आदी लवकरच बसवण्याच्या सूचना ‘एनएचआय’ला देण्यात येतील.

तसेच छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. रस्त्यासाठी ७९७ झाडे वाचवण्यात यश आले आहे, रस्त्याची अलाइनमेंट थोडी बदलून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आला आहे. एकूण २०० कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम असून, भू-संपादनाची प्रक्रिया देखील युद्धपातळीवर सुरू असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. दौलताबाद टी पॉइंटच्या निविदांबाबत श्री. भोसले म्हणाले, ५ मार्च २०२४ रोजी निविदा सूचना काढण्यात आली होती. उच्च न्यायालयात यासंदर्भातील निकाल लागून निविदा स्वीकृतीची प्रक्रिया २३ जून २०२५ रोजी पूर्ण झाली आहे. येत्या सात दिवसांत कार्यारंभाचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software