अखेर प्रयत्‍नांना यश : छावणी परिषद छत्रपती संभाजीनगर महापालिकेत समाविष्ट!; मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता महापालिकेचा आर्थिक भार वाढणार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर फलद्रुप झाली असून, छावणी परिषद ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. यामुळे या भागात नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे महापालिकेचा आर्थिक भार वाढणार असून, आगामी निवडणुकीसाठी नवा प्रभागही तयार करावा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर फलद्रुप झाली असून, छावणी परिषद ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. यामुळे या भागात नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे महापालिकेचा आर्थिक भार वाढणार असून, आगामी निवडणुकीसाठी नवा प्रभागही तयार करावा लागणार आहे.

अनेक वर्षांपासून होते प्रयत्‍न…
गेल्या अनेक वर्षांपासून छावणी परिषदेचे हस्तांतर महापालिकेकडे करण्याचा प्रयत्न होत होता. महापालिकेनही यासाठी सहमती दर्शविली आहे. छावणी परिषदेची लोकसंख्या ३० हजारांहून अधिक आहे. आता या लोकसंख्येला रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, आरोग्य सोयीसुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर असणार आहे. छावणीत ७ वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात तीन ते साडेतीन हजार मतदार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी छावणीचा परिसर गृहित धरला तर एक नवीन प्रभाग करावा लागणार आहे. छावणी परिषदेत सध्या शोधूनही अतिक्रमणे सापडत नाहीत. महापालिकेत आल्यामुळे अतिक्रमणे वाढू शकतात,
अशीही शक्‍यता आहे.

फडणवीस म्हणाले, मागणीमुळे निर्णय!
मुंबईत विधानभवन येथे राज्यातील कटक मंडळांचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबत बैठक घेण्यात आली. त्‍यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्षे कटकमंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणांहून मागणी होत असल्यामुळे केंद्र शासनाने नागरी भाग शेजारच्या महापालिका, नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहिल्यानगर, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे. प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती लक्षात घेऊन काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणे व काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे. या कटकमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे, कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावे. या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बैठकीला यांची उपस्थिती…
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे, सरोज अहिरे, संग्राम जगताप, सुनिल कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, व्हीसीद्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहमदनगर, देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

‘जिल्हा नियोजन’ मधून विकासासाठी निधी
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे, खडकी, देवळाली, औरंगाबाद, कामठी, अहमदनगर या कटकमंडळांचा संबंधित महापालिका आणि नगरपंचायतींमध्ये समावेश झाल्याने जिल्हा नियोजन समितीमधून या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून मदत करण्यात येईल. संबंधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software