एका कार्यक्रमात सत्‍य बोलल्यानंतर माझे पुतळे जाळले, धमक्या दिल्या, प्राण गेला तरी चालेल; नेहमी धर्माच्याच बाजूने राहा, महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन

On

पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) : आषाढी वारीत पुणे येथे वारकऱ्यांवर मांस फेकले. एका कार्यक्रमात सत्य बोलल्यानंतर आम्हाला धमक्या देण्यात आल्या, आमचे पुतळे जाळण्यात आले. कुणी तरी सतत देव, देश आणि धर्म यांच्यावर आघात करत आहे. याच्या मागे कोण आहे, हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा, असे धोरण […]

पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) : आषाढी वारीत पुणे येथे वारकऱ्यांवर मांस फेकले. एका कार्यक्रमात सत्य बोलल्यानंतर आम्हाला धमक्या देण्यात आल्या, आमचे पुतळे जाळण्यात आले. कुणी तरी सतत देव, देश आणि धर्म यांच्यावर आघात करत आहे. याच्या मागे कोण आहे, हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा, असे धोरण आपल्या संस्कृतीत कधीच नव्हते. ते लादण्यात आले. प्राण गेला तरी चालेल; नेहमी धर्माच्याच बाजूने राहिले पाहिजे, असे स्‍पष्ट प्रतिपादन महंत प.पू. रामगिरी महाराज यांनी केले.

पंढरपूरमध्ये ६ जुलैला वारकरी महाअधिवेशन झाले. त्‍यावेळी अध्यक्षस्थानावरून महाराज बोलत होते. अधिवेशनासाठी २ हजार वारकरी आणि हिंदू भाविक उपस्थित होते. महाअधिवेशनास महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वरशास्त्री महाराज, उपाध्यक्ष ह.भ.प. मोहन महाराज शिंदे, सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, स्वराज्य संघाचे अध्यक्ष ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, अधिवक्ता आशुतोष महाराज बडवे, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीयसहमंत्री दादा वेदक, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, शिवसेनेच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, ह.भ.प. छोटे कदम माऊली, ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुती महाराज तुनतुने, ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक सुनील घनवट, समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांच्यासह विविध संत-महंत, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software