- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- State News : १३ वर्षांचा संसार, ३ अपत्ये तरी दिशाला पडली आसिफ राजाची भूल, दोघांनी चंद्रसेनच्या नाका...
State News : १३ वर्षांचा संसार, ३ अपत्ये तरी दिशाला पडली आसिफ राजाची भूल, दोघांनी चंद्रसेनच्या नाका-तोंडावर उशी दाबली, तडफडून मृत्यू

नागपूर (सीएससीएन न्यूजडेस्क) : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. पतीच्या हत्येला तिने नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालातून तिच्या क्रूर कृत्याचा खुलासा झाला. नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके (३८, साईनाथ सोसायटी, तरोडी खुर्द, वाठोडा, नागपूर) असे […]
नागपूर (सीएससीएन न्यूजडेस्क) : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. पतीच्या हत्येला तिने नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालातून तिच्या क्रूर कृत्याचा खुलासा झाला. नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
तेरा वर्षांपूर्वी चंद्रसेन आणि दिशा यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. चंद्रसेनला काही वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका बसला. त्यानंतर दिशाने स्वतःचा मिनरल वॉटर तयार करण्याचा प्लांट सुरू केला. त्यातून दररोज कॅन विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान वाठोड्यातील महामार्गावर असलेल्या राजा इस्लाम अन्सारी याच्याशी तिचे सूत जुळले. राजाचे पंक्चर दुरुस्तीचे दुकान होते. सुरुवातीला मैत्री झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.