- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- भुमरेंच्या चालकाला १५० कोटींची जमिनीचे दान : जावेदच्या पत्रकारांना मुलाखती पण पोलिसांनी बोलावूनही ये...
भुमरेंच्या चालकाला १५० कोटींची जमिनीचे दान : जावेदच्या पत्रकारांना मुलाखती पण पोलिसांनी बोलावूनही येईना!; उद्या चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एकीकडे पत्रकारांना मुलाखती देऊन भुमरे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या जावेद यांना पोलिसांकडे येण्यास आणि पोलिसांनी केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास वेळ मिळालेला नाही. नोटीस बजावूनही जावेद आणि हिबानामा म्हणजेच देणगी पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत आले नाहीत. आता सोमवारी (३० जून) जमीन व व्यवहाराच्या मूळ कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याची नोटीस दोघांना बजावण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी पत्रकारांना सांगितले.