GOOD NEWS : छ. संभाजीनगरमध्ये ८ वी MIDC लवकरच, वाळूजजवळच्या आरापूरमध्ये १,७८८ एकरांत नवी उद्योगनगरी साकारणार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, बिडकीन, चितेगाव, पैठण या एमआयडीसीनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच आठवी एमआयडीसी होत आहे. गंगापूर तालुक्‍यात मात्र वाळूजजवळ असलेल्या आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानबाद ही गावे आठवी एमआयडीसी म्‍हणून उदयाला येणार आहेत. तिथल्या १ हजार ७८८ एकरांत ही नवी उद्योगनगरी साकारली जाणार असून, शासनाने त्‍यादृष्टीने गतीने पावले […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, बिडकीन, चितेगाव, पैठण या एमआयडीसीनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच आठवी एमआयडीसी होत आहे. गंगापूर तालुक्‍यात मात्र वाळूजजवळ असलेल्या आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानबाद ही गावे आठवी एमआयडीसी म्‍हणून उदयाला येणार आहेत. तिथल्या १ हजार ७८८ एकरांत ही नवी उद्योगनगरी साकारली जाणार असून, शासनाने त्‍यादृष्टीने गतीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

आरापूर येथे प्रस्तावित एमआयडीसीसाठी ७५१ हेक्‍टर जमीन सूचित केली आहे. या नवीन एमआयडीसीला थेट समृद्धी महामार्ग, धुळे-सोलापूर हायवेची कनेक्‍टव्हिटी मिळणार आहे. वाळूज एमआयडीसी आता पूर्णपणे विकसित झाली आहे. नवीन उद्योग, तरुणांना रोजगार संधी देण्यासाठी नवीन आठवी एमआयडीसी लाभदायी ठरणार आहे. आरापूरमधील १६९ हेक्‍टर जमीन, गवळी शिवरा ४०५ हेक्टर जमीन, सुलतानबादमधील १७७ हेक्टर व इतर ९ हेक्टर मिळून ७५१ हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचे राजपत्र शासनाने प्रसिद्ध केले आहे. वाळूज एमआयडीसीत दीड हजारच्या आसपास लघु, मध्यम आणि मोठे उद्योग असून, जवळपास १३,००० एकरांवर औद्योगिक क्षेत्र विस्तारलेले आहे. ऑटोमोबाइल, फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, अन्न प्रक्रिया आदी उद्योग वाळूज एमआयडीसीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software