- Marathi News
- सिटी क्राईम
- प्रेमविवाह केलेल्या मुलीचे कुंकू पुसणाऱ्या नराधमाला जालन्यातून अटक, छ. संभाजीनगरच्या इंदिरानगरात घडल...
प्रेमविवाह केलेल्या मुलीचे कुंकू पुसणाऱ्या नराधमाला जालन्यातून अटक, छ. संभाजीनगरच्या इंदिरानगरात घडले होते ‘सैराट’स्टाइल कांड, अटकेतील आरोपींची संख्या ३ वर
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंदिरानगरात घडलेल्या सैराट स्टाइल कांडाचा प्रमुख आरोपी गीताराम भास्कर किर्तीशाही याला जवाहरनगर पोलिसांनी जालन्यातून अटक करून आणले. तो जालन्यातील जावयाकडे लपून बसला होता. त्याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून या नराधमाने पुतण्यासह मिळून तिचा पती अमित मुरलीधर साळुंके (२५) याची चाकूने भोसकून हत्या केली होती. शनिवारी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इंदिरानगरात घडलेल्या सैराट स्टाइल कांडाचा प्रमुख आरोपी गीताराम भास्कर किर्तीशाही याला जवाहरनगर पोलिसांनी जालन्यातून अटक करून आणले. तो जालन्यातील जावयाकडे लपून बसला होता. त्याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून या नराधमाने पुतण्यासह मिळून तिचा पती अमित मुरलीधर साळुंके (२५) याची चाकूने भोसकून हत्या केली होती.
इंदिरानगरमध्ये ही घटना घडली होती. खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे लहानपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. ही दोन्ही कुटुंब इंदिरानगरमध्ये राहतात. हा विरोध मोडीत काढून दोघांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले होते. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारले. त्यामुळे ते २ मे रोजी घरी परतले. त्यांचा संसार सुरू झाला.मात्र, खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी गेलेल्या विद्याच्या पित्याचा राग राग कायम होता. तिचा पिता गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलैला रात्री अमित शतपावलीसाठी बाहेर पडला असता गीताराम व आप्पासाहेबने त्याला एकटे गाठून जीवघेणा हल्ला चढवला. चाकूने त्याच्यावर गंभीर वार केले. यात अमित गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. २५ जुलैला त्याची प्राणज्योत मालवली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 07:48:04
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बी. फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (३०...