जायकवाडीत ९ हजार ३५३ क्‍युसेकने पाणी होतेय दाखल, जलसाठा ६.२६ टक्‍क्‍यांवर

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या नाथसागरात मोठ्या प्रमाणावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आज, २८ जुलैला सकाळी सहाला पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणात एकूण ६.२६ टक्‍के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. सध्या धरणात ९ हजार ३५३ क्‍युसेकने पाणी दाखल होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या नाथसागरात मोठ्या प्रमाणावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आज, २८ जुलैला सकाळी सहाला पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणात एकूण ६.२६ टक्‍के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. सध्या धरणात ९ हजार ३५३ क्‍युसेकने पाणी दाखल होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वरच्या धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटत आहेत. तरीही जायकवाडी धरणाची पाणीपातळी अगदीच नगण्य असल्याने भविष्यात जलसंकटाची चाहूल लागली होती.

मात्र गेल्या दोन दिवसांत चित्र बदलले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात दाखल होत आहे. ही छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या वर्षी २८ जुलै रोजी जायकवाडी धरणात २९.४२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. आज धरण परिसरात ३ मि. मी. इतका पाऊस झाला.

सविस्तर तक्‍ता पहा…

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software