मोठी विमाने उतरण्यासाठी चिकलठाणा विमानतळाचा विस्तार होणार, भूसंपादनासाठी मालमत्तांचे मूल्यांकन सुरू होणार!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी १४७ एकर जमीन लागणार आहे. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ६६ कोटी ७८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आल्यानंतर सूचना-हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली. आता मालमत्तांचे मूल्यांकन आठ- दहा दिवसांत करण्यात येणार आहेत. सध्या विमानतळाची धावपट्टी ९ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी १४७ एकर जमीन लागणार आहे. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ६६ कोटी ७८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आल्यानंतर सूचना-हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली. आता मालमत्तांचे मूल्यांकन आठ- दहा दिवसांत करण्यात येणार आहेत.

सध्या विमानतळाची धावपट्टी ९ हजार ३०० फूट असून, मोठ्या विमानांसाठी धावपट्टीची लांबी किमान १२ हजार फूट असणे गरजेची आहे. चिकलठाणा, मुर्तुजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन करण्यात येत आहे. भूसंपादनासाठी १५२ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले, की भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचनेवर आलेल्या आक्षेपांवरील निर्णय महिनाभरात घेतले जातील. भूसंपादन करताना काही नागरिकांच्या मालमत्ताही बाधित होणार असून, यात पक्की- कच्ची घरांचा समावेश आहे. झाडे, विहिरीसुद्धा आहेत. या सर्व मालमत्तांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येणार आहे. मूल्यांकनासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे महसूल विभागाने तलाठी, मंडळाधिकाऱ्यांचे पथक या कामासाठी नियुक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software