- Marathi News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात टवाळखोरांची हिंमत जरा जास्तच वाढली… कांचनवाडीत जिमवरून परतणाऱ्या ‘लॉ’च्या विद्या...
छत्रपती संभाजीनगरात टवाळखोरांची हिंमत जरा जास्तच वाढली… कांचनवाडीत जिमवरून परतणाऱ्या ‘लॉ’च्या विद्यार्थिनीची भररस्त्यात छेड, उल्कानगरीत डॉक्टर महिलेकडे अश्लील मागणी…
छत्रपती संभाजीनगर (सीएसएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात गेल्या काही दिवसांत टवाळखोरांची हिंमत जरा जास्तच वाढली आहे. आधी एकटीदुकटी महिला पाहून टवाळखोर टार्गेट करायचे. आता भररस्त्यात, गजबजलेल्या परिसरातही उच्चशिक्षित महिलांची छेड काढायला ते कचरत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात घडलेल्या दोन घटनांनी टवाळखोरांनी कळस गाठल्याचे दिसून आले आहे. कांचनवाडीत काय घडलं?कांचनवाडीच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत २१ […]
छत्रपती संभाजीनगर (सीएसएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात गेल्या काही दिवसांत टवाळखोरांची हिंमत जरा जास्तच वाढली आहे. आधी एकटीदुकटी महिला पाहून टवाळखोर टार्गेट करायचे. आता भररस्त्यात, गजबजलेल्या परिसरातही उच्चशिक्षित महिलांची छेड काढायला ते कचरत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात घडलेल्या दोन घटनांनी टवाळखोरांनी कळस गाठल्याचे दिसून आले आहे.
कांचनवाडीच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत २१ वर्षीय तरुणी शिकते. ती मूळची दिल्लीची आहे. तीन वर्षांपासून शिक्षणानिमित्त छत्रपती संभाजीनगरात राहते. तिने कांचनवाडी, पैठण रोडवरील टोटल फिटनेस जिम जॉईन केलेली आहे. नेहमीप्रमाणे १९ जुलैला सायंकाळी ४ वाजता ती जिमला गेली. सायंकाळी साडेपाचला जिममधून बाहेर पडली. तेव्हा तिच्याकडे एक तरुण मोटारसायकलीवर (MH 20 AZ 9965) आला. तिला म्हणाला, की कहा जाना है बैठ, मैं छोड देता हू… ते ऐकून तरुणी दचकलीच. ती त्याला ओळखतही नव्हती. त्याला टाळण्यासाठी ती जवळच असलेल्या मेडीकलमध्ये गेली. तिथेसुद्धा तो मागेमागे आला. मोटारसायकल साईडला उभी करून थांबला.
उल्कानगरीत राहणाऱ्या ४७ वर्षीय दंतचिकित्सक महिला त्यांचे क्लिनिक बंद करून १८ जुलैला रात्री पावणेदहाच्या सुमारास घरी आल्या. कंपाऊंडमधील पार्किंगमध्ये गाडी घेऊन जाण्यासाठी जागा नसल्याने अपार्टमेंटच्या गेटबाहेर मोपेड उभी करून इतर गाड्या सरकवत असताना तिथल्या एका मोपेड गाडीवर एक व्यक्ती येऊन उभा राहिला. कानात हेडफोन असल्याने डॉक्टर महिलेचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्यांनी त्याच्याकडे बघितले असता तो डॉक्टरांकडे बघून काहीतरी बोलत होता. त्यामुळे डॉक्टर महिलेने कानातील कॉड काढून त्याच्याकडे पाहिले असता त्याने अश्लील मागणी केली. त्याला काय झाले, असे डॉक्टरांनी विचारले असता त्याने पुन्हा अश्लील मागणी केली.
त्यावर त्याला तुम्ही असे का बोलता, असे विचारून थांबा, असे डॉक्टर जोरात ओरडल्या असता तो त्याच्याकडील मोपेडवरून लक्ष्मी सॅन्डविजकडे पळून गेला. डॉक्टर महिलेने त्यांच्या मोपेडवरून त्याचा पाठलाग केला. परंतु काही अंतरानंतर तो दिसून आला नाही. त्यामुळे डॉक्टर घरी आल्या. त्यानंतर कुटुंबीयांसह जवाहरनगर पोलीस ठाण्यात येऊन अश्लील मागणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे, दाढी वाढलेली, डोक्यात पांढरी टोपी, अंगात पांढरा शर्ट, अंगाने जाडजूड असे त्याचे वर्णन डॉक्टर महिलेने तक्रारीत केले आहे. पोलीस त्याला शोधत आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार रेवती थोरवडे करत आहेत.