मिटमिट्याच्या हॉटेल दुबईवर थार, सफारी गाडीतून आलेल्या टोळक्‍याचा हल्ला!; कॅशियर, वेटरसह कामगारांना बेदम मारहाण, तोडफोड

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मिटमिटा येथील हॉटेल दुबईवर थार, सफारीसारख्या अलिशान वाहनांतून आलेल्या टोळक्‍याने मंगळवारी (४ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ नंतर हल्ला चढवला. कॅशियर, वेटरसह कामगारांना बेदम मारहाण करत हॉटेलची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. कॅशियरच्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) १० जणांच्या टोळक्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रल्हाद सोमेश्वर मोटे (वय ३४, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मिटमिटा येथील हॉटेल दुबईवर थार, सफारीसारख्या अलिशान वाहनांतून आलेल्या टोळक्‍याने मंगळवारी (४ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ नंतर हल्ला चढवला. कॅशियर, वेटरसह कामगारांना बेदम मारहाण करत हॉटेलची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. कॅशियरच्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) १० जणांच्या टोळक्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात प्रल्हाद सोमेश्वर मोटे (वय ३४, रा. नाईकनगर, बीड बायपास) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते मिटमिटा येथील दुबई हॉटेलमध्ये कॅशियर आहेत. याच भागात संतोष अमले याचे माऊली हॉटेल असून त्यांची मुले माऊली, चिकू आणि अभिषेक हे अधूनमधून दुबई हॉटेलमध्ये येतात. मंगळवारी (४ फेब्रुवारी) रात्री ११ ला दुबई हॉटेलचे गेट बंद केले व त्यानंतर हॉटेलमधील सर्व कर्मचारी जेवण करत होते. रात्री १२ वा. च्या सुमारास पडेगाव येथील माऊली अमले व त्याच्यासोबत आणखी १ जण गेट उघडून हॉटेलमध्ये आले. वेटरला अरेरावी करून जेवायला पाहिजे, असे सांगितले.

वेटरने हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. मोटे यांनीही आता १२ वाजले असून हॉटेल बंद झाले आहे, असे माऊलीला सांगितले. त्यावर माऊलीने शिवीगाळ करून तुला माहीत नाही का, मी संतोष अमलेचा मुलगा आहे. तू फक्त ५ मिनीट थांब, तुझ्यासहीत तुझे हॉटेलच फोडून टाकतो, असे बोलून हॉटेलच्या बाहेर गेला. ५-१० मिनिटांत माऊली अमले व त्याचे दोन भाऊ चिकू, अभिषेक तसेच इतर आणखी ६ ते ७ अनोळखी मुले थार व सफारी या चारचाक्या गाड्यांमध्ये बसून आले. ते सर्वजण हॉटेलमध्ये घुसले. त्यांच्या सर्वांच्या हातात लोखंडी रॉड, लाकडी काठ्या, हॉकी स्टिक होत्या. माऊली अमले याने लोखंडी रॉड मोटे यांच्या डोक्यात मारण्यासाठी उगारला त्यावेळी मोटे यांनी उजवा हात आडवा केला असता त्याने उजव्या हाताच्या मनगटावर व पाठीवर रॉडने मारून जखमी केले.

चिकू व अभिषेक यांनी लाकडी काठी व हॉकी स्टिकने किचनमध्ये काम करणारा मुलगा कुमेल अब्बास याला पायावर, हातावर, पाठीवर मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबतच्या इतर मुलांनीही मोटे आणि कुमेल अब्बासला खाली पाडून छाती, पोटात व अवघड जागेवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तेथून हॉटेलचे काही कामगार घाबरून ते राहणाऱ्या रूमकडे पळत गेले. हल्लेखोरांना त्यांना मारायला धावून गेले. कामगारांनी रूमचे दरवाजे लावून आतमध्ये बसल्यानंतर त्यांनी दरवाजावर लाथा मारल्या व त्यांच्याकडील लोखंडी रॉड, लाकडी काठ्या व हॉकी स्टिकने सर्व रुमच्या खिडकीच्या काचा फोडल्या. हॉटेलमधील फ्रिज, शोभेच्या वस्तू, किचनमधील साहित्य व इतर वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले. हॉटेलचा कामगार मुलगा फुरकान यालाही पाठीवर हॉकी स्टिकने मारून जखमी केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान नराळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software