बस उलटून नऊ प्रवासी जखमी; अजिंठा घाटातील भीषण अपघात

 
bus

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात बस उलटून नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज (ता. तीन) दुपारी एकच्या सुमारास घडली.

bus

बस पुणे येथून रावेर येथे ६६ प्रवासी घेऊन जात होती. अजिंठा घाटात दुपारी एकच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने उलटली. नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती   मिळताच सहायक  निरिक्षक प्रफुल साबळे यांनी फौजदार शरद वाघुले, रामराव आढे, भागवत शेळके, ज्ञानेश्वर बेले, ईश्वर पाटील, निलेश लोखंडे पोलीस मित्र आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य केले. जखमीना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविले व बाकी सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसवून दिले. ही घटना दरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवण्यात आले .
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे खालील प्रमाणे आहेत.                                    
१) सुशिलाबाई दिनकर निरखे 
    वय ( ७०) , रा. जामनेर
२) सुमित्रा दिनकर निरखे  , वय ( ४८)
     रा. जामनेर                   
 ३) विजय हरी सुर्यवंशी  वय ( ७२)                     
     रा जामनेर या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले
किरकोळ जखमीचे नाव
१) सरुबाई शामराव पाटील वय ( ६ ५
रा. श्रीरामपुर ).
२) वसंत विठल पठारे वय ( ६ ५
रा. सोयगांव .)
३) निखिल किरण पाटील (१३)
रा. श्रीरामपुर 
४) संध्या वसंतराव पठारे ( ६३)
रा . सोयगांव 
५) जयमाला विजय सुर्यवंशी ( ६०
रा . जामनेर )
६) ज्योती साईचंद्र बासनेवल ( ४०
रा . संभाजीनगर)

Tags