सासरवाडीत वाढदिवस साजरा करून परतलेल्या अभियंत्‍याची आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सासरवाडीत पत्नी, मुलगी आणि सासरच्या मंडळीसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर घरी आलेल्या अभियंता गजानन साहेबराव शिंदे (वय ३२, रा. साईनगर रेसिडेन्सी, ए-६ रो हाऊस, सिडको महानगर-१, तिसगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (२७ जानेवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गजानन शिंदे पत्नी, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सासरवाडीत पत्नी, मुलगी आणि सासरच्या मंडळीसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर घरी आलेल्या अभियंता गजानन साहेबराव शिंदे (वय ३२, रा. साईनगर रेसिडेन्सी, ए-६ रो हाऊस, सिडको महानगर-१, तिसगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (२७ जानेवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

गजानन शिंदे पत्नी, दोन वर्षीय मुलगी, भाऊ प्रवीण शिंदे व त्यांची पत्नी सोबत वास्तव्यास होते. ते वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत अभियंता म्‍हणून कार्यरत होते. त्‍यांच्या वाढदिवसाची पार्टी सासरवाडीत ठेवलेली होती. ते टीव्ही सेंटर येथे सासरवाडीत गेले होते. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास गजानन हे वाढदिवस साजरा करून घरी एकटेच आले होते. त्यांच्या भावाला मुलगा झाल्याने ते रुग्णालयात गेलेले होते. मध्यरात्री दोनला त्यांचे भाऊ घरी आले असता गजानन दरवाजा उघडत नव्हते.

कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी कॉल केला. मात्र तोही गजानन यांनी न उचलल्याने झोप लागली असेल, असे समजून त्यांचे भाऊ प्रवीण हे नातेवाइकांकडे झोपण्यासाठी गेले. सोमवारी सकाळी साडेसातला ते परत घरी आले, तरीही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घराच्या गच्चीवरून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना गजानन यांनी हॉलमधील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना प्रवीण शिंदे यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राम तांदळे करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीत मद्यधुंद क्रूझरचालकाचा थरार, ५ वाहने उडवली, ४ शिक्षिकांसह रिक्षाचालक जखमी

Latest News

वाळूज एमआयडीसीत मद्यधुंद क्रूझरचालकाचा थरार, ५ वाहने उडवली, ४ शिक्षिकांसह रिक्षाचालक जखमी वाळूज एमआयडीसीत मद्यधुंद क्रूझरचालकाचा थरार, ५ वाहने उडवली, ४ शिक्षिकांसह रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी-जोगेश्वरी रस्‍त्‍यावर गुरुवारी (३१ जुलै) दुपारीसाडेचारच्या सुमारास मद्यधुंद क्रूझरचालकाने थरार घडवला. दोन...
व्यापारी गजानन देशमुख यांचा मुलगा इंद्रसेन बेपत्ता; स्‍कूलबस सुटल्याने पालक रागावण्याच्या भीतीने घर सोडल्याची शक्यता!, अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुंडलिकनगर पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू
सहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून हैदराबादला विकण्याआधीच छ. संभाजीनगरमध्ये टोळी पकडली!, मोठ्या रॅकेटची शक्‍यता 
चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software