छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नगर विकास विभागातर्फे १९ व २० जानेवारी असे दोन दिवस विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

स्पर्धांचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींचे सुमारे ६०० कर्मचारी सहभागी झाले. अंतिम विजेते संघ असे : क्रिकेट- जालना, कबड्डी- धाराशिव, व्हॉलीबॉल- नांदेड, रिले ४x४०० मी. (पुरुष)- छत्रपती संभाजीनगर, रिले ४x१०० मी. (पुरुष)- नांदेड, रिले ४x१०० मी. (महिला)-छत्रपती संभाजीनगर, रस्सीखेच (पुरुष)- लातूर, रस्सीखेच (महिला)- छत्रपती संभाजीनगर. स्पर्धेनंतर विजेत्यांना सह आयुक्त देविदास टेकाळी, सहायक आयुक्त संजय केदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.