छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या ३ महिन्यांत मोबाइल हरवल्याच्या जवाहर पोलीस ठाण्यात जितक्याही तक्रारी दाखल झाल्या, त्या घटनांचा तपास पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या आदेशाने विशेष पथकाने युद्धपातळीवर करून सायबर पोलिसांची मदत घेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे १५ मोबाइल परत मिळवले. एकूण २ लाख ८८ हजार रुपयांचे मोबाइल जप्त करून ते ज्याचे होते त्याला परत करण्यात आले.

अनघा जितेंद्र महेशमालकर, संदीप रामनाथ वाघ, पंकज प्रकाशराव वेरुळकर, दीपक बाबुलाल बताडे, प्रविण लक्ष्मण शेजूळ, योगेश कंकर बोरसे, रवींद्र बन्सी अवस्थी, राजन रावसाहेब इधाटे, भाऊसाहेब जगन्नाथ शेंगुळे, काकाराव शामराव काकडे, कमलेश बाहुबली गंगवाल, रमेश बन्सी लाखे, प्रफुल्ल सुरेश घोडके, विठ्ठल काशीनाथ दौड, पियुष प्रकाश महल्ले यांना आज, २० जानेवारीला सहायक पोलीस आयुक्त रंजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या हस्ते मोबाइल देण्यात आले.
मजेशीर किस्से आले समोर…
मोबाइल परत घेताना अनेकांनी आपल्या मोबाइलची महती सांगितली. एक जण म्हणाला, की हा मोबाइल त्यांच्या पत्नीने वाढदिवसाला गिफ्ट दिलेला होता. दुसऱ्याने सांगितले, की मोबाइल हप्त्याने घेतला होता. हप्ते अजून भरणे सुरू आहेत. तिसऱ्याला मोबाइल आई- वडिलांनी गिफ्ट केलेला होता. एकाने जर अजबच माहिती दिली. त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्या वाढदिवसाला मोबाइल गिफ्ट केला होता, असे सांगितले. हरवलेला मोबाइल परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यांनी जवाहरनगर पोलिसांचे आभार मानले. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त रंजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारोती गोरे, मोफतलाल राठोड, विजय सुरे, महिला पोलीस अंमलदार सारीका दिगंबर शेडुते यांनी केली.