छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपल्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर मोबाइल चोराने सुरीने हल्ला चढवला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. हा थरार रविवारी (१९ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास जटवाडा रोडवरील अल्फा केअर हॉस्पिटलसमोर घडला.
शेख वाहेद शेख मोहसीन (वय २१, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड, हर्सूल) असे हल्लेखोर मोबाइल चोराचे नाव आहे. पोलीस अंमलदार विजय निकम जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेख वाहेदकडून ११ सेंटीमीटर लांबीचा सुरा व चोरीचा मोबाइल जप्त केला आहे. हा मोबाइल त्याने कांचनवाडीतील दुकानाचे शटर उचकटून चोरला होता.