छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वरूड काझी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे कंपनी कामगाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (१९ जानेवारी) दुपारी अडीचच्या सुमारास समोर आली.
चिकलठाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू केला आहे. बाळासाहेब विष्णू दांडगे (वय ३५, रा. वरूड काझी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.