- Marathi News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरात गटई स्टॉल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगरात गटई स्टॉल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहायक आयुक्त समाजकल्याण या कार्यालयामार्फत अनुसूचित जातीतील बांधवाचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर गटई पत्र्याचे स्टॉल पुरविले जातात. अटी व शर्ती अशा :अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.अर्जदाराच्या कुटूंबाचे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहायक आयुक्त समाजकल्याण या कार्यालयामार्फत अनुसूचित जातीतील बांधवाचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर गटई पत्र्याचे स्टॉल पुरविले जातात.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी ४० हजार व शहरी भागात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे.
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.
अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोनमेंट बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी.
इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासंह ३१ जानेवारी २०२५ पूर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास संपर्क साधवा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण प्रदीप वेणू, मुरलीधर भोगले यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...