कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : सुरमाळ (ता. कन्नड) येथील नवनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत १०८ विष्णुगिरी महाराज (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (१६ जानेवारी) दुपारी साडेतीनला निधन झाले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते.
विष्णुगिरी महाराज हे तालुक्यातील घाटशेंद्रा येथील रहिवासी होते. त्यांनी बाल वयातच संन्यास स्वीकारला होता. सुरमाळ येथील नवनाथ संस्थान येथे सेवा सुरू केली. ते जनार्दन स्वामींचे शिष्य होते. छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, जळगाव, नाशिक जिल्ह्यात त्यांचे हजारो शिष्य आहेत.