अभिनेत्री तमन्ना भाटिया आता ३५ वर्षांची झाली आहे. तिच्याकडे गडगंज मालमत्ता आहे. तिचा प्रियकर विजय वर्मा याची कमाई चांगली आहे. प्रचंड कमाईसोबतच तमन्नाकडे अनेक मालमत्ता आणि महागड्या कारदेखील आहेत. तिची कमाई विजय वर्मापेक्षा जास्त आहे.

तमन्ना भाटिया ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. २००५ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी तिने करिअरची सुरुवात चांद सा रोशन चेहरा या हिंदी चित्रपटातून केली होती. गेल्या काही वर्षांत तिने हिंदी आणि दक्षिणेकडील चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय केला आहे. तमन्ना भाटिया या महिन्याच्या सुरुवातीला दुबईमध्ये झालेल्या सलमान खानच्या दबंग : द टूर रीलोडेडमध्ये सहभागी झाली होती. मुंबईत तिचे सुंदर घर जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील बेव्ह्यू अपार्टमेंटच्या १४ व्या मजल्यावर आहे. ८० हजार ७७८ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या अपार्टमेंटची किंमत १६.६० कोटी रुपये आहे. तिने मुंबईतील तीन अपार्टमेंट ७.८४ कोटी रुपयांना गहाण ठेवले आहेत.

या मालमत्ता लोखंडवाला, अंधेरी पश्चिम येथे आहेत आणि त्यांचे एकूण क्षेत्रफळ २,५९५ चौरस फूट आहे. तमन्ना भाटियाकडे अनेक अलिशान कार आहेत. तिच्या कलेक्शनमध्ये BMW 320i, जिची किंमत आहे ४३.५० लाख रुपये, मर्सिडीज-बेंझ GLE, जिची किंमत आहे १.०२ कोटी रुपये, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट, जिची किंमत आहे २९.९६ लाख आणि लँड रोव्हर रेंज रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट, जीची किंमत ७५.५९ लाख रुपये आहे. तमन्नाची एकूण संपत्ती १२० कोटी आहे. तिचा बॉयफ्रेंड विजय वर्माबद्दल सांगायचे तर, त्यानेही बॉलीवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विजय एका चित्रपटासाठी ८५ लाख रुपये घेतो. त्याने अलीकडेच त्याची पहिली कार जीप कंपास खरेदी केली आणि अंधेरी येथे त्याचे एक अलिशान अपार्टमेंट आहे. २०२४ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपये आहे. तमन्ना भाटियाची एकूण संपत्ती विजय वर्मापेक्षा कितीतरी जास्त आहे. दोघांची मिळून एकूण संपत्ती १४० कोटी रुपये आहे. जर अलीकडील अंदाज खरे ठरले तर हे जोडपे लवकरच लग्न करताना आपण पाहू शकतो.