छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चांगल्या दर्जाचे लॅपटॉप, कॉम्प्युटर घ्यायचं म्हटलं की भरपूर पैसे मोजावे लागतात, अशी प्रत्येकाची धारणा असते. ते खरेही आहे. पण कमी किंमतीत तेच लॅपटॉप, कॉम्प्युटर छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना उपलब्ध करून देणारे लॅपट्रिक्स कॉम्प्युटरचे मालक स्वरुप साळुंके सध्या चर्चेत आहेत. उच्च दर्जाचे लॅपटॉप, कॉम्प्युटर कुणालाही परवडणाऱ्या किंमतीत ते उपलब्ध करून देतात, त्यामागचं गणित काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे, हे ऐकलं की कुणीही अचंबित होईल…
आजचे युग संगणकाचे आहे. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात पुढे जायचे असेल तर घरात लॅपटॉप, कॉम्प्युटरशिवाय पर्याय नाही. शिक्षण असो, की नोकरी प्रत्येकाला लॅपटॉप, कॉम्प्युटरची गरज भासतेच. बदलत्या काळात त्यांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे मुलाने लॅपटॉप मागितला, की मध्यमवर्गीय व्यक्तीच्या पोटात गोळा येतो. त्यातल्या त्यात अत्याधुनिक फिचर्सचे लॅपटॉप घ्यायचे म्हटले की लाखाच्या घरात ते जातात. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खास करून तशाच फिचर्सचे लॅपटॉप आवश्यक असतात. हे लॅपटॉप अत्यंत किंमतीत उपलब्ध करून देण्याचे काम श्री. साळुंके करतात. लॅपटॉप, कॉम्प्युटर रीफर्बिश्ड कंडीशनमध्ये असतात. त्यामुळे कमी किंमतीत उपलब्ध करून दिले जातात. त्यावर वॉरंटीही आमच्याकडून दिली जाते, असे ते म्हणाले.

२ वर्षांपूर्वी सुरू केला व्यवसाय, आजपर्यंत पुरवले ३ हजारांहून अधिक लॅपटॉप, कॉम्प्युटर…
स्वरुप साळुंके यांनी दोन वर्षांपूर्वी लॅपटिक्स कॉम्प्युटरची सुरुवात केली. हळूहळू त्यांची प्रसिद्धी इतकी वाढत गेली की २ वर्षांत ३ हजारांहून अधिक लॅपटॉप, कॉम्प्युटरची विक्री केल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च क्वालिटी आणि गुणवत्तेचे लॅपटॉप देत असल्याने ग्राहकांच्या आजवर तरी कोणत्या तक्रारी आल्या नाहीत, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. खास करून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. कारण त्यांना हवे असलेले लॅपटॉप खूप उच्च दर्जाचे, अत्याधुनिक असावे लागतात. ते घ्यायचे म्हटले की, लाख-दीड लाख रुपये खर्च होतात, तेच लॅपटॉप अवघ्या २५-३० हजारांत आम्ही उपलब्ध करून देत असल्याने त्यांचा फायदा होतो, असे श्री. साळुंके म्हणाले.
शेतकरी पूत्र ते संगणक तज्ज्ञ…
२९ वर्षीय स्वरुप साळुंके यांचे वडील शेतकरी आहेत. ते मूळचे फुलंब्री तालुक्यातील शिरोडीचे असून, ते एमएस्सी झालेले आहेत. सुरुवातीला ते वेगवेगळ्या संस्थांत संगणक शिक्षण द्यायचे. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात पर्दापण करण्याचे ठरवले. भविष्यात वेगवेगळ्या शहरांतही शाखा सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रोडक्शनचेही त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्याकडे लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप-कॉम्प्युटरला जोडली जाणारी अन्य उपकरणे, जसे की ॲन्टीव्हायरस, की-बोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर, पेनड्राइव्ह, हार्डडिस्क सर्व उपलब्ध आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विक्रीही त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्याकडील लॅपटॉप-कॉम्प्युटर हप्त्यावरही भेटतात, त्यासाठी बजाज फिनसर्व्हशी त्यांनी टायअप केला असल्याचे त्यांनी सांगितले.
लॅपट्रिक कॉम्प्युटरचा पत्ता आणि संपर्क क्रमांक : टीव्ही सेंटर महापालिका कॉम्प्लेक्स शॉप नं. २८, छत्रपती संभाजी महाराज चौक, कीर्ती ड्रायफ्रूटच्यावर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क : ८९९९८११७२४