- Marathi News
- सिटी क्राईम
- विभागीय क्रीडा संकुल २१ कोटी घोटाळा : बँक अधिकाऱ्यासह दोन लिपिकांना अटक, आणखी ५ कोटींच्या रकमेचा हिश...
विभागीय क्रीडा संकुल २१ कोटी घोटाळा : बँक अधिकाऱ्यासह दोन लिपिकांना अटक, आणखी ५ कोटींच्या रकमेचा हिशेब लागेना!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागीय क्रीडा संकुलाच्या २१ कोटी ५९ लाख रुपयांच्या घोटाळ्यात आणखी तिघे संशयित समोर आले असून, त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (११ जानेवारी) अटक केली. यात क्रीडा विभागाचा पूर्णवेळ वरिष्ठ लिपिक स्वप्निल त्र्यंबक तांगडे (वय ३३, रा. प्रथमेशनगरी, सातारा परिसर), इंडियन बँकेचा तत्कालीन सहव्यवस्थापक सचिन रमेश वाघमारे (वय ३७, रा. संसारी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागीय क्रीडा संकुलाच्या २१ कोटी ५९ लाख रुपयांच्या घोटाळ्यात आणखी तिघे संशयित समोर आले असून, त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (११ जानेवारी) अटक केली. यात क्रीडा विभागाचा पूर्णवेळ वरिष्ठ लिपिक स्वप्निल त्र्यंबक तांगडे (वय ३३, रा. प्रथमेशनगरी, सातारा परिसर), इंडियन बँकेचा तत्कालीन सहव्यवस्थापक सचिन रमेश वाघमारे (वय ३७, रा. संसारी नाका, देवळाली, नाशिक) आणि बँकेचा लिपिक नितीन नारायण लाखोले (वय ३६, रा. भवानीनगर, जुना मोंढा) यांचा समावेश आहे. कामात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करून घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सचिन वाघमारे, नितीन लाखोले यांनी नियम डावलून हर्षकुमारला नेट बँकिंगला परवानगी कशी दिली? हर्षकुमार व सचिन, नितीन आणि स्वप्नील तांगडे यांच्यात पैशांचा व्यवहार झालाय का? याबाबत तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने मांडले. त्यानंतर न्यायालयाने चौघांनाही १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मोठी संस्था, शासकीय विभागात विभागप्रमुखांकडून आर्थिक व्यवहार, बँकेच्या नियमित कामकाजासाठी ठरावीक व्यक्ती प्राधिकृत केली जाते. तसे पत्र संबंधित खात्यांना दिले जाते. हर्षकुमारबाबत असे कुठलेच पत्र नव्हते. तरीही कोट्यवधींचे व्यवहार, कॅश बुक नोंदी हर्षकुमार करीत होता. विभाग व बँकेने त्यावर आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे या घोटाळ्यात आणखी बरेच जण सहभागी असण्याची शक्यता वाढली आहे.
-लेखा विभागाचे कॅशबुक लिहिणे, व्यवहारांच्या नोंदी, बँकेचे व्यवहार, आयडी पासवर्डची जबाबदारी या गोष्टी लेखी सूचनांनुसार वरिष्ठ लिपिक स्वप्निल तांगडेकडे असायला हव्यात. मात्र त्याने हर्षकुमारकडे ती जबाबदारी दिली. शिवाय, हर्षकुमार करत असलेल्या कामाची कधी फेरपडताळणीही स्वप्निलने केली नाही.
-नितीन लाखोले याने तर कहरच केला, जेव्हा त्याला हर्षकुमारचा ई- बँकिंगसाठी ई-मेल आला. तेव्हा दोनदा त्याने मेल बनावट व अनधिकृत असल्याने नकार दिला. तिसऱ्या वेळेस मात्र परवानगी देत वरिष्ठांकडे पाठवला.
-ई-बँकिंगचा प्रस्ताव नितीनकडून सचिनकडे गेला. ई-बँकिंगसाठी प्रत्यक्षात फॉर्म भरून घेणे, प्राधिकृत व्यक्तीची परवानगी, संपर्क करून खातरजमा करणे आवश्यक होते. सचिनने याकडे दुर्लक्ष केल्याने हर्षकुमारचे फावले.
आरोपीच्या वकिलांकडून असा केला बचाव…
सचिन वाघमारे व नितीन लाखोले यांच्यावतीने बचाव करताना ॲड. प्रशांत निकम यांनी न्यायालयात सांगितले, की क्रीडा उपसंचालक सबनीस यांचे पत्र असल्याने, त्यावर त्यांची सही होती. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा दोष नाही. बँक कर्मचाऱ्यांना हर्षकुमारने प्रत्यक्ष लाभ दिल्याचा एकही पुरावा नाही. सबनीस यांची फसवणूक झालेली आहे, मग त्यांनी का तक्रार दिली नाही, असा युक्तीवाद त्यांनी केला.