छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी दोन्ही भावंडांना अभ्यास लक्षात न राहण्याची समस्या होती. कितीही अभ्यास केला तरी ही समस्या उद्भवयाची… त्यामुळे दोघांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता.. एकेदिवशी त्यांचे वडील संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत सहभागी झाले, ती कार्यशाळा त्यांना इतकी भावली की, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना कार्यशाळेत आणले. त्यावेळी आजघडीला डॉक्टर असलेल्या मृणाल पिदुरकर ८ वीत शिकत होत्या… ही कार्यशाळा जणू दोन्ही भावंडांचं आयुष्य बदलणारी ठरली. मृणाल डॉक्टर झाल्या, तर त्यांचा भाऊ यश हे इंजिनिअर झाले आहेत… ही सर्व किमया आम्ही एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेतील सहभागामुळे साधू शकलो, असे प्रांजळ मत छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजशी बोलताना डॉ. मृणाल पिदुरकर यांनी व्यक्त केले.
लाईफ कोच, मेमोरीगुरू, मोटिवेशनल ट्रेनर, संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या सायन्स ॲाफ सक्सेस प्रशिक्षण कार्यशाळेमुळे अनेकांचं आयुष्य यशस्वी झाल्याचं हे बोलकं उदाहरण आहे. यश आणि डॉ. मृणाल यांचा यशाबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या तापडिया नाट्य मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे वडील विलासराव पिदुरकर, आई सुनंदा पिदुरकर उपस्थित होते. यश नुकताच कॉम्युटर इंजिनिअरिंगमध्ये सर्व सेमिस्टरमध्ये टॉप रँकमध्ये उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, सातवीत असताना त्याला शाळेत जायचाही कंटाळा यायचा. त्याचं ब्रेन प्रोग्रामींग करून शाळेविषयी, अभ्यासाविषयी नांदेडकर यांनी आवड निर्माण केली. पुढेही तो नांदेडकर यांच्याशी सातत्याने मार्गदर्शन, स्मरशक्तीविकास प्रशिक्षण घेत होता. त्याची बहीण डॉ. मृणाल यांच्या यशात नांदेडकर यांच्या कार्यशाळेचा मोठा वाटा आहे. या दोघांसह त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार मंगळवारी (२४ डिसेंबर) तापडिया नाट्यमंदिरात करण्यात आला. दरम्यान, एस. के. नांदेडकर यांची दर आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात छत्रपती संभाजीनगर शहरात कार्यशाळा होणार असून, शनिवार, २८ डिसेंबर व रविवार, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ तापडिया नाट्य मंदिरात ही कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत व मर्यादित आहेत. त्यामुळे नावनोंदणीसाठी आता ९८५०१७०९३६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.