छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवळाईतील म्हाडा कॉलनीत शनिवारी (७ डिसेंबर) दुपारी पायल नितीन ठोंबरे (वय १५) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तुमच्या मुलीला पेन देण्यास एक मुलगा आल्याचे शिक्षकाने घरी कळवल्यानंतर घरच्यांनी यासंदर्भात विचारण्याचा प्रयत्न केल्याने राग येऊन मुलीचे टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी सांगितले, की पायल एका शाळेत दहावीत शिकत होती. तिच्या वडिलांचे सँडविच विक्रीचे दुकान आहे. तिला पेन देण्यासाठी शाळेत मुलगा आल्याचे शिक्षकाने तिच्या घरी कळवले. शनिवारी शाळेतून ती घरी आल्यावर पालकांनी तिला यासंदर्भात विचारणा केली. याचा राग पायलला आला. ती घरातील खोलीत गेली व आतून कडी लावून घेत गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच घरच्यांनी तिला तत्काळ बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पायलला एक लहान भाऊ, आई, वडील आहेत. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिसांनी घेतली आहे.