सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : खड्डा चुकविण्याच्या नादात कारवर भरधाव दुचाकी धडकली. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (६ डिसेंबर) सायंकाळी सहाला सोयगाव शहराजवळ घडली. सोनीराम नारायण बनकर (वय २५, रा. कडेवडगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
सोनीराम दुचाकीने (क्र. एमएच १९ इएफ ८७८३) फर्दापूरकडून सोयगावकडे जात होता. सोयगावजवळ गोगडी नाल्याच्या पुलाजवळ खड्डा चुकविण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या कारवर धडकला. सोनीरामचा जागीच मृत्यू झाला. सोनीरामच्या पश्चात आई आहे.