छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे कॉलेजमधून अपहरण करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा रोड भागात बुधवारी (४ डिसेंबर) दुपारी दोनला समोर आली.
मुलीच्या भावाने हर्सूल पोलीस ठाण्यात बहिणीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. भावाने तिला सकाळी साडेदहाला जटवाडा भागातील कॉलेजमध्ये सोडले. दुपारी २ ला तो परत तिला घ्यायला आला असता बहीण कॉलेजमध्ये दिसली नाही. आजूबाजूला, नातेवाइकांकडे चौकशी केली, मात्र ती मिळून आली नाही. तिचे कुणीतरी अपहरण केल्याची शक्यता त्याने पोलीस तक्रारीत व्यक्त केली आहे. मुलगी कोळीवाडा राधास्वामी कॉलनीतील आहे. शाळेत १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ असल्याने ती लाल साडी, लाल ब्लाऊज, सोबत काळी बॅग आणि काळा गॉगल घालून गेली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ करत आहेत.