छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आंबेडकरी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष समिती लवकरच विशाल मशाल मोर्चा काढणार आहे. समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी ही माहिती दिली. संघटनेची बैठक सोमवारी (२ डिसेंबर) झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
ज्येष्ठ मार्गदर्शक रामराव दाभाडे अध्यक्षस्थानी होते. श्रावण गायकवाड यावेळी म्हणाले, की आंबेडकरी समाजाच्या विविध मागण्यांसाठी समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून मोर्चा, धरणे, निदर्शने, आंदोलने करण्यात आली. मात्र शासन- प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याचा जाब जिल्हा प्रशासनाला विचारण्यासाठी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. बैठकीला एस.एस. जमधडे, किशोर गडकर, बाळू भाऊ वाघमारे, प्रा. दीपक खिल्लारे, गौतम गणराज, राहुल वडमारे, विनोद कासारे, अरुण खरात, मच्छिंद्र नरवडे, प्रा. अनिल गवळे, विजय मोरे, बाळू मगरे, कचरू गवळी, जी.एस. दोडवे, अर्जुन दाभाडे, मिलिंद दाभाडे, अशोक सोनवणे, मनोज नरवडे, सुमित जाधव, संतोष बनकर, भीमराव ढेपे आदी उपस्थित होते.