गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : कोबापूर (ता. गंगापूर) शिवारात अनिल धूपचंद थोरात (वय २४, रा. कोबापूर) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (३ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आली.
अनिल सकाळी शौचासाठी घराजवळील शिवारात गेला होता. बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने भाऊ राहुलने त्याचा शोध घेतला. दुपारी साडेबाराच्या सुमारास लिंबाच्या झाडाला मफलरच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनिल आढळला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिलला फासावरून उतरवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी सातला त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अनिल याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद गंगापूर पोलिसांनी घेतली आहे.