छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अहमदाबाद विमानसेवा काही काळासाठी इंडिगोने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. चिकलठाणा विमानतळावरून १ डिसेंबरपासून अहमदाबादसाठी इंडिगोचे विमान उड्डाण भरणार नाही.
एवढेच नाही तर इंडिगोने बंगळुरूची विमानसेवा आठवड्यातून ४ ऐवजी ३ दिवस केली आहे. शहरातून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा, नागपूर, लखनौ, अहमदाबादसाठी विमानसेवा आहे. त्यापैकी अहमदाबादचे विमान बंद होत आहे. इंडिगोची हैदराबाद, मुंबईसाठी दिवसातून दोन वेळा विमानसेवा आहे. लखनौ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-गोवा विमान मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे आठवड्यातून ३ दिवस आहे.