छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुणे येथील प्रसिद्ध लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे उद्या, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ यावेळेत बन्सीलालनगर येथील तापडिया डायग्नोस्टिक सेंटर येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच इतर हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार असल्याची माहिती लोकमान्य हॉस्पिटलतर्फे देण्यात आली.
डॉ. नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक असून, विविध गावांत सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी, खुब्याचे तसेच मणक्यांच्या विकाराविषयी मार्गदर्शन करतात. अत्याधुनिक उपचाराची माहिती देतात. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आधीचे रिपोर्ट, एक्स-रे आणि अन्य काही रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे. गुडघेदुखी ही समस्या आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.
बदलती जीवनशैली, वाढत्या वजनामुळे गुडघ्यांची समस्या अधिकच वाढते. गुडघ्याची तपासणी सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषधी, व्यायामांनी आजार बरा होतो. मात्र गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर उपचार करता येतात. अंतिम टप्प्यातील झीज, पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यात आता रोबोटिकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे. ही यंत्रणा भारतात आणणारे विख्यात तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य स्वतः रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.