छ.संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील तापडिया नाट्य मंदिरात उद्या, २२ नोव्हेंबर सायंकाळी सातला सुपर माईंड पावर सेमिनार आहे. या कार्यशाळेत प्रवेश मोफत असून, प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी, गृहिणी, व्यावसायिकांनी 9850170936 या नंबरवर कॉल करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी खास ब्रेन प्रोग्रामींगद्वारे ॲडीक्शनपासून सुटका करून अभ्यासाची आवड निर्माण केली जाते. परीक्षेची भीती घालवता येते. नैराश्यातून आशादायकतेकडे नेले जाते. स्मरणशक्तीची २० सूत्रे ज्याद्वारे संपूर्ण पुस्तक लक्षात ठेऊ शकता. कार्यशाळेत विद्यार्थ्यांसोबत पालकांनी येणे आवश्यक आहे. याशिवाय गृहिणी आणि व्यावसायिकांनाही या कार्यशाळेचा लाभ होतो. स्ट्रेस, डिप्रेशन, नैराश्य, ओसीडीच्या समस्या दूर होतात. नाते संबंध दृढ करण्याचे मनोवैज्ञानिक प्रशिक्षण देणाराही हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे.