छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एकीकडे मतदानाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शहरातून ५ महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत.
मंदा प्रकाश बागूल (वय ३५, रा. भोंडवे हॉटेलसमोर, नगर हायवे) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. शिवांगी सुदाम गौड (वय १८, रा. गारखेडा गाव) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सपना विलास मोरे (वय २२, रा. रांजणगाव शेणपुंजी) ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी केली आहे. रेखा सतीश पवार (वय २६, रा. मार्तंडनगर, सातारा गाव) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याशिवाय आसमा बेगम कलीमोद्दीन (वय ३८) ही महिला सिल्कमील कॉलनीतून बेपत्ता झाली असून, सातारा पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.