स्वरा भास्करचे मौलाना सज्जाद नोमानीसोबतचे फोटो व्हायरल झाल्यापासून वेगळीच चर्चा सुरू आहे. मुलींच्या शिक्षणाविरोधात बोलणाऱ्यांच्या पाठीशी ती कशी उभी राहते, तेही आदराने, अशा प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर पडत आहे.
स्वरा पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या वादात अडकली आहे. शनिवारी स्वरा ही पती फहाद अहमदसोबत नोमानी यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेली होती. नंतर, फहाद यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले, जनाब हजरत मौलाना सज्जाद नौमानी साहब यांच्या सेवेला हजर राहिलो आणि त्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले… व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये स्वरा पिंक रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसली होती आणि तिच्या डोक्यावर दुपट्टा होता, तर फहाद पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला. या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, त्यांनी मौलाना नोमाणा यांना भेटल्याबद्दल अभिनेत्री स्वरावर टीकाही केली.
स्वरा भास्कर फेमिनिझम आणि महिला सशक्तीकरणाबाबत बकवास बोलण्यासाठी ओळखली जाते. तरीही तिने मुलींना शाळा-कॉलेजात पाठवण्याच्या विरोधात असलेल्या सज्जाद नोमानी यांना भेटायचे ठरवले, अशी टीका एका युझरने केली. दुसऱ्याने ट्विट केले, की ती तिचे कपडे, जीवनसाथी, राजकारण आणि धर्म ठरवते. पण तिचा ढोंगीपणाही समोर आला आहे. ती स्त्रीवादासाठी ओरडते पण अभिमानाने स्त्री शिक्षणाचा निषेध करणाऱ्या आणि तालिबानला पाठिंबा देणाऱ्या पुरुषासोबत उभे राहते. हे सर्व मतांसाठी… अन्य एकाने लिहिले, की स्वरा भास्कर हिला तालिबान कट्टरतावादी मौलाना सज्जाद नोमानी यांचे आशीर्वाद मिळतात, जे मुलींच्या शिक्षणाला विरोध करतात. स्वराने गेल्या वर्षी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी लग्न केले. त्यांची मुलगी राबिया हिचा जन्म त्याच वर्षी २३ सप्टेंबरला झाला. या वादावर स्वराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.