- Marathi News
- सिटी क्राईम
- कर्णपुरा यात्रेमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; यात्रा परिसरातून जाणार असाल तर हे बदल आधी वाचा…
कर्णपुरा यात्रेमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; यात्रा परिसरातून जाणार असाल तर हे बदल आधी वाचा…
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कर्णपुरा येथील यात्रेला आज, ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आमच्या यापूर्वीच्या बातम्यांत यात्रेबद्दल सविस्तर माहिती, एकूणच प्रशासनाचे नियोजन प्रसिद्ध झाले आहे. कर्णपुरा यात्रा परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने शहर वाहतूक पोलिसांनी परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. आजपासून १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ पर्यंत हा बदल लागू […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कर्णपुरा येथील यात्रेला आज, ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आमच्या यापूर्वीच्या बातम्यांत यात्रेबद्दल सविस्तर माहिती, एकूणच प्रशासनाचे नियोजन प्रसिद्ध झाले आहे. कर्णपुरा यात्रा परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने शहर वाहतूक पोलिसांनी परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. आजपासून १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ पर्यंत हा बदल लागू असणार आहे.
-लोखंडी पूल ते पंचवटी चौक जाणारा व येणारा मार्ग.
-कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग.
-बाबा पेट्रोल पंप ते पंचवटी चौक उड्डाणपुलाखालील जाणारा व येणारा मार्ग.
-रेल्वे स्टेशनकडून पंचवटी चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग.
-रेल्वेस्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानक, छावणी, पडेगावकडे जाणारी सर्व वाहने ही महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) उड्डाणपुलाचा वापर करतील.
-नाशिक, धुळ्याकडून येणारी व जालना, बीडकडे जाणारी वाहने शरणापूर फाटा, साजापूर फाटा, ए. एस. क्लब लिंक रोड-महानुभाव आश्रम चौक, बीड बायपास या मार्गाने जातील व येतील.
-नाशिक, धुळ्याकडून येणारी व पैठणकडे जाणारी वाहने ही शरणापूर फाटा, साजापूर फाटा, ए.एस. क्लब, लिंक रोड या मार्गाने किंवा नवीन धुळे-सोलापूर महामार्गावरून जातील.
-पुणे-अहमदनगरकडून येणारी व जालना, बीडकडे जाणारी वाहने ए. एस. क्लब, लिंक रोड, महानुभाव आश्रम चौक, बीड बायपास रोडने जातील.
-जालना बीडकडून येणारी व नगर, धुळे, नाशिककडे जाणारी वाहने केंब्रिज नाका, झाल्टा फाटा, बीड बायपास रोड, महानुभाव आश्रम, लिंक रोड, ए.एस. क्लबमार्गे जातील.
-कोकणवाडी चौकाकडून पंचवटी चौकाकडे येणारी वाहने रेल्वे स्टेशन किंवा क्रांती चौकमार्गे जातील.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 18:49:35
अजिंठा, ता. सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : व्हिडीओ बनवताना छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करणाऱ्या युट्यूबरला औरंगाबाद म्हण असे म्हणत बहुत मारेंगे,...