छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी काळातील सण, उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे आदेश लागू असतील.
आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्यास, दाहक स्फोटक पदार्थ बाळगण्यास, प्रक्षोभक भाषणे, असभ्य वर्तन करण्यास, प्रतिमा, आकृत्यांचे प्रदर्शन करण्यास तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अन्य सक्षम अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.