छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपत्ती व्यवस्थापन जाणीव जागृतीचा चित्ररथ मंगळवारी (१ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला. हा चित्ररथ गावोगावी जाऊन आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती देणार आहे. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मारुती मस्के, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आग, गर्दी, विविध साथरोग, भूकंप, रस्ते अपघात, दुष्काळ या परिस्थितीत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती चित्ररथावर लेखी स्वरुपात तसेच ऑडिओ स्वरुपात सांगितली जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे विमोचनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ही माहिती पुस्तिका नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी महत्त्वाचे क्रमांक
जिल्हा नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर 0240 2331077
घाटी रुग्णालय 0240 2402422
शहर पोलीस 100 / 0240 2240500
ग्रामीण पोलीस 100 / 240 2381633
अग्निशमन दल 0240 2334000 / 9823270782
समृद्धी महामार्ग 8181818155 / 18002332233
रुग्णवाहिका 108 / 102
रेल्वे अपघात हेल्पलाइन 1072
रस्ते अपघात हेल्पलाइन 1073