छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात एकटी असलेली अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना तरुणाने घरात घुसून तिचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (३० सप्टेंबर) सकाळी अकराला उस्मानपुरा परिसरात ही घटना घडली. मुलीच्या आईने या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अजय प्रकाश खरात (२५, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. अजयने चोरून घरात प्रवेश करून मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना मोबाइलमध्ये तिचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्याने मुलीने आईला सांगितले. त्यानंतर तिच्या आईने मुलीसह उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास केला जात आहे.