छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजित सीडस् प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांची सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (सियाम) अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. सन २०२४-२६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड पुण्यात झालेल्या ११ व्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व कार्यकारी समिती सदस्य पदांसाठी निवडणूक झाली. सर्व पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली, असे निवडणूक समितीचे अध्यक्ष महेंद्र देशमुख व सदस्य ॲड. नंदकिशोर देशमुख यांनी घोषित केले. नूतन कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष रितेश मिश्रा, वैभव काशिकर, सचिव किशोर वीर, खजिनदार सचिन भालिंगे, सहखजिनदार जितेंद्र सोळंकी, सहसचिव नाथा राऊत व अक्षय भरतीया तर सदस्य अजित मुळे, प्रभाकर शिंदे, शंतनू मोगल. आभार प्रदर्शन डॉ. शालिग्राम वानखेडे, किशोर वीर यांनी केले.