छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील एच.आर. विभागातील कर्मचाऱ्यांसाठी २३ सप्टेंबरला संवाद कौशल्यावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रसिद्ध संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
एच. आर. विभागप्रमुख सन्माननिय श्री. कोल्हारकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. एस. के. नांदेडकर हे संमोहनउपचार तज्ज्ञ, मोटिव्हेशनल ट्रेनर, मेमोरी गुरू म्हणून सर्व परिचित आहेत. त्यांच्या लाईफ मॅनेजमेंट विषयक कार्यशाळांमुळे अनेकांच्या जीवनात जादूई परिवर्तन घडत आहे. त्यांच्या कार्यशाळा दर शनिवार, रविवारी सायंकाळी सातला छत्रपती संभाजीनगरातील तापडिया नाट्यमंदिरात होत असतात. या कार्यशाळांना शहरवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. विद्यार्थी, व्यावसायिक, गृहिणी, कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेत सहभागी होऊन आयुष्यातील अडअडचणी, आरोग्यविषयक समस्यांवर मात केली आहे. अनेकजण नैराश्यावर मात करू शकले आहेत.
श्री. नांदेडकर हे कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून अनेक नामांकित कंपन्या, संस्थांमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, इफेक्टीव्ह कम्युनिकेशन स्कील, व्यसनमुक्तता, सकारात्मक जीवन पद्धती व कार्यक्षमता विकास या विषयी कार्यशाळा घेत असतात. त्यांची शहरात सर्वांसाठी होणारी कार्यशाळा या आठवड्यात तापडिया नाट्यमंदिरात शनिवार, २८ सप्टेंबर व रविवार, २९ सप्टेंबरला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत एस. एम. पी. ग्रुपच्या वतीने आयोजित केली आहे. या कार्यशाळेत प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे. मात्र आधी नावनोंदणी गरजेची असून, सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी पालकांनी, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांनी 9850170936 या नंबरवर संपर्क करावा, असे आयोजक एस. एम. पी. ग्रुपच्या वतीने कळवण्यात आले आहे.