छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीड बायपासवरील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (२१ सप्टेंबर) रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर शस्त्रक्रियेत चूक झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.
संदीप ज्ञानेश्वर डहाळे (४५, रा. मयूर पार्क) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव असून, शस्त्रक्रियेनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. मात्र नातेवाइकांनी हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप लावला आहे. दुपारी चारला हर्नियाची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच संदीप डहाळे यांची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.