- Marathi News
- सिटी डायरी
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा दि.२८ सप्टेंबर रोजी
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा दि.२८ सप्टेंबर रोजी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा -२०२३ शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या विहित वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्राच्या एका […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा -२०२३ शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या विहित वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात आले आहे.
परीक्षार्थिंसाठी सुचनाः-
१. परीक्षेस येतांना उमेदवारांने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
२. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र
व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
३. उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल.
४. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.