छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, सर्वस्तरावरील नागरिकांचा छत्रपती संभाजीनगरात दर आठवड्यात शनिवार, रविवारी होणाऱ्या संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांचा विकास घडवून आणण्यासोबतच समस्या निर्मूलनही करतात. या कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत आहे, पण आधी नावनोंदणी गरजेची आहे. नावनोंदणीसाठी 9850170936 आणि 8087492943 या नंबरवर कॉल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात शनिवार २१ सप्टेंबर आणि रविवारी २२ सप्टेंबरला सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहेत. या कार्यशाळेला सुपर माईंड पावर सेमिनार असे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचे काय लाभ होतात, हे सांगताना श्री. नांदेडकर म्हणाले, की ब्रेन प्रोग्रामींगद्वारे ॲडीक्शनपासून सुटका करून अभ्यासाची आवड निर्माण केली जाते. परीक्षेची भीती घालवून, नैराश्यातून आशादायकतेकडे नेण्याचे काम केले जाते. स्मरणशक्तीची २० सूत्रे ज्याद्वारे संपूर्ण पुस्तक लक्षात ठेवले जाऊ शकते, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांसोबत पालकांनी येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांना भीती, चिंता, मनात अनेक विचार येणे, निद्रानाश, व्याधी व व्यसनाधिनता, मानसिक समस्या असतात. त्यांच्याही समस्यांचे निवारण कार्यशाळेत केले जाते.
कौटुंबिक सौख्यावरही परिणाम…
परिवारिक समस्यांवरही रामबाण तोडगा कार्यशाळेतून मिळतो. नातेसंबंध दृढ करण्याचे मनोवैज्ञीनिक प्रशिक्षण देणारा प्रेरणादायी कार्यक्रम घेतला जातो. यामुळे अनेकांचं जीवन आनंदी अन् यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने श्री. नांदेडकर यांच्या कार्यशाळा छत्रपती संभाजीनगरात होत असून, दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतच आहे. अनेक उच्चपदस्थ व्यक्तींनीही कार्यशाळेला हजेरी लावून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.