- Marathi News
- जिल्हा न्यूज
- खुलताबाद रोडवर २ भीषण अपघात; नंद्राबादजवळ कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळून १ ठार, पडेगावजवळ हिट ॲ...
खुलताबाद रोडवर २ भीषण अपघात; नंद्राबादजवळ कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळून १ ठार, पडेगावजवळ हिट ॲन्ड रन, स्कुटीस्वाराला चिरडून कार पसार
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद रोडवर दोन भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. एका घटनेत नंद्राबादजवळ कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळून एकाचा तर दुसऱ्या घटनेत पडेगावजवळ स्कुटीस्वाराला चिरडून कारचालक पसार झाला. घटना पहिली…अक्षय संतोष गाडेकर (वय २५) व विजय सुखदेव जाधव (वय २५, दोघेही रा. मोठी आळी, खुलताबाद) हे दोघेही अविवाहित तरुण भद्रा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद रोडवर दोन भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. एका घटनेत नंद्राबादजवळ कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळून एकाचा तर दुसऱ्या घटनेत पडेगावजवळ स्कुटीस्वाराला चिरडून कारचालक पसार झाला.
अक्षय संतोष गाडेकर (वय २५) व विजय सुखदेव जाधव (वय २५, दोघेही रा. मोठी आळी, खुलताबाद) हे दोघेही अविवाहित तरुण भद्रा मारोती मंदिराजवळ पेढे विक्रीचे काम करत होते. बुधवारी सायंकाळी ते कारने खुलताबादहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. विजय कार चालवत होता. नंद्राबाजवळ भरधाव कारवरील विजयचे नियंत्रण सुटले.
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पडेगाव रोडवर घडली. या प्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर कारचालक मात्र पसार झाला. शेख उजेब (रा. टाऊन हॉल) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेख इसरार शेख सत्तार (१८, रा. टाऊन हॉल) यांनी तक्रार दिली.
१६ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास शेख इसरार, शेख उजेब व शेख दानिश असे तिघे दुचाकीने खुलताबाद उरूस पाहून घरी परतत होते. त्यांच्या ॲक्टिव्हा स्कूटीला पडेगाव रोडवरील एसएससी ढाब्याजवळ कारने समोरून जोरदार धडक दिली. धडकेत शेख उजेब जागीच ठार झाला. जखमी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पसार झाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...