- Marathi News
- सिटी क्राईम
- सुसाट हायवा, ट्रक बनले यमदूत!; छत्रपती संभाजीनगरात दोघांना चिरडले!!; आंबेडकरी नेते अशोक जाधव यांचा म...
सुसाट हायवा, ट्रक बनले यमदूत!; छत्रपती संभाजीनगरात दोघांना चिरडले!!; आंबेडकरी नेते अशोक जाधव यांचा मृतकांत समावेश
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर, परिसरात हायवा, ट्रक सुसाट धावत आहेत. वेगावर नियंत्रण नसल्याने ते यमदूत बनले असून, कधी कुणाला चिरडतील काहीच भरवसा नाही. छत्रपती संभाजीनगरात सोमवारी (१६ सप्टेंबर) वडिलांना दवाखान्यात घेऊन येणाऱ्या युवकाला सुसाट हायवाने ७० ते ८० फूट चिरडत नेले, तर आंबेडकरी नेते अशोक जाधव यांना भरधाव ट्रकने धडक देत पोबारा केला. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर, परिसरात हायवा, ट्रक सुसाट धावत आहेत. वेगावर नियंत्रण नसल्याने ते यमदूत बनले असून, कधी कुणाला चिरडतील काहीच भरवसा नाही. छत्रपती संभाजीनगरात सोमवारी (१६ सप्टेंबर) वडिलांना दवाखान्यात घेऊन येणाऱ्या युवकाला सुसाट हायवाने ७० ते ८० फूट चिरडत नेले, तर आंबेडकरी नेते अशोक जाधव यांना भरधाव ट्रकने धडक देत पोबारा केला.
भरधाव हायवाने युवकाला चिरडल्याची घटना सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झाल्टा फाट्याजवळ घडली. सचिन भागवत पानखडे (वय ३१, रा. राजपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून, तो वडिलांना दवाखान्यात घेऊन येत होता. सचिनचे वडील आजारी असल्याने त्यांना घेऊन सचिन कारने छत्रपती संभाजीनगरला येत होता. सोबत भाऊ रामेश्वर आणि प्रल्हाद होते. झाल्टा फाटा येथे ते लघुशंकेसाठी थांबले. सचिन लघुशंका करून झुडुपातून रस्त्यावर आला अन् त्याचवेळी निपाणीकडून शहराकडे भरधाव निघालेल्या हायवाने (क्र. एमएच २० जीसी ५५०९ ) त्याला धडक दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांतीनगरात राहणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक गोविंद जाधव (५८) यांना सोमवारी दुपारी खुलताबाद-कसाबखेडा रस्त्यावर भरधाव ट्रकने चिरडले. ते कामानिमित्त खुलताबादला गेले होते. तेथे भाजी खरेदी करून दुचाकीने घराकडे येत असताना कसाबखेडा रस्त्यावर त्यांची भाजीची पिशवी निसटून पडली. ती घेण्यासाठी ते वाकले असता मागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक देऊन पोबारा केला. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...