छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरातच सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सिडको पोलिसांनी छापा मारून नवजीवन कॉलनीत ८ जणांना पकडले. ही कारवाई शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.
सुभाष संपत इंगळे याने घरात जुगार अड्डा सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी एन ११ नवजीवन कॉलनीत वरखेडदेवी माता मंदिराजवळ जाऊन इंगळेच्या तीन मजली घराच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर जात जुगाऱ्यांवर एकच हल्लाबोल केला. यावेळी सुभाष संपतराव इंगळे याच्यासह महेश दिगंबर जगताप (म्हसोबानगर, मयूर पार्क), दिलीप आसाराम जगताप (नवजीवन कॉलनी शनी मंदिरामागे), भागवत रामेश्वर वटाणे (रा. सुरेवाडी), विष्णू माणिकराव तोरडमल (रा. एकनाथनगर पिसादेवी रोड), दीपक आसाराम घात्रे (रा. सहयोगनगर), संजय महादू मस्के (रा. साई कॉलनी पिसादेवी), शेख भिकन शेख नबी (बायजीपुरा गल्ली नं. २७) या ८ जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रदीप दंडवते करत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री. देवकते, सहायक फौजदार सुभाष शेवळे, प्रदीप दंडवते, पोलीस अंमलदार सहदेव साबळे, गायकवाड, उत्तम जाधव, विशाल सोनवणे, महिला पोलीस अंमलदार गोरे यांनी केली.