या दोन आत्‍महत्‍या तुमचा संताप वाढवतील..!; फुलंब्री, गंगापूरच्या घटना

On

गंगापूर/ फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतात वारंवार पाणी साचत असल्याने वैतागलेल्या माजी सरपंच शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्‍टेंबर) सकाळी दिवशी पिंपळगाव (ता. गंगापूर) येथे घडली. अरुण भाऊसाहेब वावरे (वय ५८) असे मृत्‍यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वावरे यांची छत्रपती संभाजीनगर-नांदगाव मार्गाला लागून दिवशी पिंपळगावच्या जवळच गट क्रमांक […]

गंगापूर/ फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतात वारंवार पाणी साचत असल्याने वैतागलेल्या माजी सरपंच शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्‍टेंबर) सकाळी दिवशी पिंपळगाव (ता. गंगापूर) येथे घडली. अरुण भाऊसाहेब वावरे (वय ५८) असे मृत्‍यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

वावरे यांची छत्रपती संभाजीनगर-नांदगाव मार्गाला लागून दिवशी पिंपळगावच्या जवळच गट क्रमांक १६० मध्ये सामायिक शेती आहे. महामार्गाच्या खालून टाकलेला नालापाइप दुसऱ्या बाजूने दाबल्याने पावसाचे पाणी वावरे यांच्या शेतात साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी वावरे यांचे भाऊ संजय वावरे यांनी प्रशासनाकडे मागणी केल्याने प्रशासनाने पंचनामा केला. त्यानुसार तहसीलदारांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यास पत्र दिले होते. मात्र अभियंत्याने पुढे काहीच कार्यवाही केली नाही. त्‍यामुळे अरुण वावरे हताश झाले होते.

दिवशी पिंपळगाव गावाला लागूनच शेतात अरुण वावरे कुटुंबीयासह वास्तव्यास होते. बुधवारी रात्री गौरीपूजन करून ते नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसह झोपी गेले. गुरुवारी पहाटे पाचला आंघोळ करून देवदर्शन घेतले. नंतर साडेपाचच्या सुमारास घरासमोर असलेल्या छताच्या हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. लहान भाऊ संजय वावरे यांनी त्यांना बेशुद्धावस्थेत लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी, सासू असा परिवार आहे.

मराठा आरक्षणासाठी युवकाने घेतला गळफास
दुसऱ्या घटनेत खामगाव गोरक्ष (ता. फुलंब्री) येथील ३५ वर्षीय बारकू सांडू सोनवणे या शेतकऱ्याने मराठा आरक्षणासाठी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्‍टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. बारकू सोनवणे हे अल्पभूधारक शेतकरी असून, जिल्हा बँकेत साफसफाईचे काम करत होते. घरातील सदस्य बाहेर गेले असता त्यांनी लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांची पत्नी घरी आल्यावर त्यांना बाळू यांनी गळफास घेतल्याचे पाहिले अन्‌ हंबरडा फोडला. बाळू यांना तत्काळ फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बारकू सोनवणे यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली आहे. त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software